YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 16:29-34

लेवीय 16:29-34 MARVBSI

तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो; कारण त्या दिवशी तुम्हांला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल; परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल. तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्या दिवशी तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; हा निरंतरचा विधी होय. आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्‍चित्त करावे. त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे. इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्‍चित्त करण्यात यावे, म्हणून हा तुम्हांला निरंतरचा विधी होय.”परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.