YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 7:11-16

ईयोब 7:11-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन. तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे? माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल. तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते. म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो. मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.

सामायिक करा
ईयोब 7 वाचा

ईयोब 7:11-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही; मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन; माझ्या जिवास क्लेश होतात म्हणून मी गार्‍हाणे करीन. मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू माझ्यावर सक्त नजर ठेवतोस? माझा बिछाना मला शांती देईल, ‘माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील’ असे मी म्हणतो;’ तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करतोस, मला दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस; म्हणून माझ्या अस्थिपंजरापेक्षा माझा गळा दाबून मला मारले तर ते मला बरे! मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस श्वासवत आहेत.

सामायिक करा
ईयोब 7 वाचा