YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 29:7-17

ईयोब 29:7-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत. अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. सरदार मनुष्य सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे. लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी. का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे. मृत्युपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी घेऊन जात असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून घेऊन जात असे. गरीब लोकांस मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांसदेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.

सामायिक करा
ईयोब 29 वाचा

ईयोब 29:7-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे, तरुण मला पाहून बाजूला होत असत, आणि वृद्ध आदराने उभे राहत; अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत; सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून शांतपणे उभे राहत असत. ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली. कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली. मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले. नीतिमत्वाला मी पांघरले होते; न्याय हाच माझा झगा व मुकुट असे. मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो. मी गरजवंतांचा पिता होतो; आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे. मी दुष्टांचे जबडे फाडून त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले.

सामायिक करा
ईयोब 29 वाचा

ईयोब 29:7-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी, तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत; सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत; अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही. कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई; कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी. नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी. नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे. मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई. मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई. मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.

सामायिक करा
ईयोब 29 वाचा