YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 29:7-17

इय्योब 29:7-17 MRCV

“जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे, तरुण मला पाहून बाजूला होत असत, आणि वृद्ध आदराने उभे राहत; अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत; सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून शांतपणे उभे राहत असत. ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली. कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली. मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले. नीतिमत्वाला मी पांघरले होते; न्याय हाच माझा झगा व मुकुट असे. मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो. मी गरजवंतांचा पिता होतो; आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे. मी दुष्टांचे जबडे फाडून त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले.

इय्योब 29 वाचा