YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 29:7-17

ईयोब 29:7-17 MARVBSI

मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी, तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत; सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत; अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही. कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई; कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी. नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी. नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे. मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई. मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई. मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.