ईयोब 23:11-12
ईयोब 23:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे; मी त्याचा मार्ग धरून आहे; त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही. त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.
सामायिक करा
ईयोब 23 वाचाईयोब 23:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही. मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
सामायिक करा
ईयोब 23 वाचाईयोब 23:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे; दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे. मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही; माझ्या दररोजच्या अन्नापेक्षा त्यांच्या तोंडचे शब्द मला मौल्यवान आहेत.
सामायिक करा
ईयोब 23 वाचा