YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 23

23
देवापुढे आपला वाद करण्याची ईयोबाची इच्छा
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“अजूनही माझे गार्‍हाणे हटवादाचे आहे; त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे.
3देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोहचलो असतो, तर किती बरे होते!
4मग माझी फिर्याद मी त्याच्यापुढे मांडली असती; माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते.
5तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते; तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते.
6त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाही; तर त्याने माझी दाद घेतली असती.
7त्याच्याशी वाद करणारा न्यायी ठरला असता; म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो;
8पाहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही.
9डाव्या बाजूस, जेथे तो आपली कृती करतो तिकडे, त्याला मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही; मी उजवीकडे वळतो, तिकडेही तो मला दिसत नाही;
10परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.
11त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे; मी त्याचा मार्ग धरून आहे; त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही.
12त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.
13तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्या मनास येते ते तो करतो;
14जे मला नेमले आहे ते तो घडवून आणत आहे; अशा पुष्कळ गोष्टी त्याच्याजवळ आहेत;
15म्हणून त्याच्यासमोर मी घाबरा होतो मी ह्याचा विचार करतो तेव्हा मला त्याची भीती वाटते.
16देवाने माझे मन उदास केले आहे; सर्वसमर्थाने मला हैराण केले आहे.
17अंधकारामुळे मला दहशत वाटली असे नाही. घोर अंधकाराने माझे मुख झाकले म्हणून मला भय वाटते असे नाही

सध्या निवडलेले:

ईयोब 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन