योहान 5:1-8
योहान 5:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत; कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.] तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या दुखणेकर्याने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.” येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
योहान 5:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला. यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
योहान 5:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले. आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरेमिक भाषेत बेथसैदा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या. येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत. कारण प्रभुचा दूत वेळोवेळी येऊन, ते पाणी हालवीत असे आणि पाणी हालविताच तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे. तेथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक माणूस होता. येशूंनी त्याला तेथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून, त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” “महाराज,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.” तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरुण उचलून चालू लाग.”
योहान 5:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यानंतर यहुदी लोकांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमला गेला. यरुशलेममध्ये मेंढरे नावाच्या फाटकाजवळ एक तलाव आहे. त्याला हिब्रू भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याला लागून पाच पडव्या आहेत. [त्यांमध्ये रोगी, आंधळे, पांगळे आणि लुळे ह्यांचा मोठा समुदाय असे. ते पाणी ढवळण्याची वाट पाहत असत; कारण देवदूत वेळोवेळी तलावात उतरून पाणी ढवळत असे आणि पाणी ढवळल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला, तरी तो बरा होत असे.] तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या रुग्णाने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी ढवळते तेव्हा मला तलावात सोडायला माझा कोणी माणूस नसतो. मी जातो न जातो तोच दुसरा कोणी तरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.”