काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले. आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरेमिक भाषेत बेथसैदा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या. येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत. कारण प्रभुचा दूत वेळोवेळी येऊन, ते पाणी हालवीत असे आणि पाणी हालविताच तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे. तेथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक माणूस होता. येशूंनी त्याला तेथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून, त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” “महाराज,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.” तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरुण उचलून चालू लाग.”
योहान 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 5:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ