YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहा. 5:1-8

योहा. 5:1-8 IRVMAR

त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला. यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”

योहा. 5:1-8 साठी चलचित्र