YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:21-32

योहान 13:21-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.” तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले. मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती. तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे; देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:21-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकुळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.” त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना. त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता. “कोणाविषयी सांगत आहे हे विचारुन आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले. तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभुजी, तो कोण आहे?” येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र, यहूदा इस्कर्योत याला दिला. यहूदाने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.” येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. काहींना वाटले की यहूदाच्या हाती पैशाचा कारभार असल्या कारणाने, सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरीबांना काही द्यावे म्हणून येशूंनी सांगितले असेल. मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदा बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती. तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे; जर परमेश्वराचे गौरव त्याच्यामध्ये झाले, तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करील आणि लवकरच गौरव करील.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:21-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकूळ झाला व निश्‍चितार्थाने म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल.” तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता; म्हणून ज्याच्याविषयी तो बोलला तो कोण आहे हे आम्हांला सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे.” मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे ते लवकर करून टाक.” पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावेत किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे, असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला; त्या वेळी रात्र होती. तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे; देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील; तो त्याचा लवकर गौरव करील.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:21-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळला व उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.” तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. तो कोणाविषयी बोलतो, हे विचार, असे पेत्राने त्या शिष्याला खुणावून सांगितले. तेव्हा तो येशूच्या उराशी टेकलेला होता तसाच येशूला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.” त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला. भाकरीचा तुकडा दिल्याबरोबर सैतान त्याच्यात शिरला. येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे, ते लवकर करून टाक.” मात्र त्याने त्याला असे कशासाठी सांगितले, हे भोजनास बसलेल्यांतील इतर कोणाला समजले नाही. यहुदाजवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी जे आवश्यक आहे ते विकत घ्यावे, किंवा गरिबांना काहीतरी द्यावे, असे येशू सांगत आहे, असे काही शिष्यांना वाटले. भाकरीचा तुकडा घेतल्यावर यहुदा लगेच बाहेर गेला. ती रात्रीची वेऴ होती. यहुदा बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचे वैभव प्रकट झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे आणि जर त्याच्याद्वारे देवाचे वैभव प्रकट झाले आहे, तर देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील. तो त्याचा लवकरच गौरव करील.

सामायिक करा
योहान 13 वाचा