असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकुळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.” त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना. त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता. “कोणाविषयी सांगत आहे हे विचारुन आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले. तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभुजी, तो कोण आहे?” येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र, यहूदा इस्कर्योत याला दिला. यहूदाने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.” येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. काहींना वाटले की यहूदाच्या हाती पैशाचा कारभार असल्या कारणाने, सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरीबांना काही द्यावे म्हणून येशूंनी सांगितले असेल. मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदा बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती. तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे; जर परमेश्वराचे गौरव त्याच्यामध्ये झाले, तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करील आणि लवकरच गौरव करील.
योहान 13 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 13:21-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ