YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 5:1-19

यिर्मया 5:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. “परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत. तेव्हा मी म्हटले, “हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत; परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत. ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत. ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत. “मी तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नाहीत त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे; मी त्यांना पोटभर चारले तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली. खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्‍याच्या बायकोला पाहून खिंकाळतो. परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार? तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत. कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो. ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही. संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’ ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील. परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही. त्यांचा भाता उघडी कबर आहे; ते सर्व पराक्रमी वीर आहेत. ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.” “तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’

सामायिक करा
यिर्मया 5 वाचा

यिर्मया 5:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन. परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.” हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे. तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही. म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता. म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत. मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला. भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला. तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का? तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही. कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो. त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही, अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही. संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.” यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तू हे बोलला याकारणास्तव पाहा, मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील. पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही. त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत. तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील, ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.” “पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो. हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”

सामायिक करा
यिर्मया 5 वाचा

यिर्मया 5:1-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.” हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत. म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली. हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो. हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय? “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत. इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात. ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही. संदेष्टे निव्वळ वारा आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.” म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.” याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही. त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत. ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील. “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात. जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.