यिर्मया 17:9-11
यिर्मया 17:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार? मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो. अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल.
यिर्मया 17:9-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे? “मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.” तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.
यिर्मया 17:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.” तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल.