याकोब 4:11-17
याकोब 4:11-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस. जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्याला दोष लावणारा तू कोण? अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.” पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.” आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे. म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.
याकोब 4:11-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो, अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता, आणि पाळीत नाही तर न्याय करणारे व्हाल. नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहे, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु तू आपल्या शेजार्याचा न्याय करणारा तू कोण? आता ऐका, जे तुम्ही म्हणता, “आज किंवा उद्या आम्ही या किंवा त्या शहरात जाऊ, तेथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.” तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभुची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.” जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. जर कोणाला, योग्य करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप आहे.
याकोब 4:11-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण? अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,” त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.
याकोब 4:11-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूंविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस, तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरविणारा तू कोण? अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’, त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. उलट तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूची इच्छा असेल, तर आपण जगू व अमुक-अमुक करू’. परंतु आता तुम्ही उर्मटपणाने फुशारकी मारता आणि अशी फुशारकी दुष्ट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.