याकोब 4
4
पक्षकलहाबाबत सूचना
1तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?
2तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही.
3तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता.
4अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.
5“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?
6तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”
7म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.
8देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.
9कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.
10प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.
11बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.
12नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण?
बढाई मारू नये म्हणून इशारा
13अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,”
14त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.
15असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा.
16आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.
17चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.
सध्या निवडलेले:
याकोब 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.