YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 4:11-17

याकोब 4:11-17 MRCV

प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो, अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता, आणि पाळीत नाही तर न्याय करणारे व्हाल. नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहे, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु तू आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण? आता ऐका, जे तुम्ही म्हणता, “आज किंवा उद्या आम्ही या किंवा त्या शहरात जाऊ, तेथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.” तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभुची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.” जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. जर कोणाला, योग्य करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप आहे.

याकोब 4 वाचा