YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 25:6-9

यशया 25:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील, तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील. त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील. तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील परमेश्वर देव हे बोलला आहे हे तो करीलच. सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, “पाहा हा आमचा देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे त्याची आम्ही वाट पाहातो, कारण तोच आमचे तारण करणारा आहे, हा आमचा परमेश्वर आहे, आम्ही सर्व आंनदी आहो कारण त्याच्याकडून आम्हांला तारण प्राप्ती होईल.

सामायिक करा
यशया 25 वाचा

यशया 25:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील, जुन्या द्राक्षारसाची मेजवानी— सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस. जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते, चादर जी सर्व राष्ट्रांना झाकते, या पर्वतावर याहवेह तिचा नाश करतील; सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत. त्या दिवशी लोक असे म्हणतील, “निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत; आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले. हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला; चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.”

सामायिक करा
यशया 25 वाचा

यशया 25:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्‍यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”

सामायिक करा
यशया 25 वाचा