YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 25

25
याहवेहचे स्तवनगीत
1याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात;
मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन,
कारण परिपूर्ण विश्वासूपणाने
तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत,
ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.
2तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले,
तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले,
परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत.
ते परत कधीही बांधले जाणार नाही.
3म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील;
निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील.
4तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात,
गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात,
वादळामध्ये निवारा आहात
आणि उष्णतेमध्ये सावली आहात.
कारण निर्दयी लोकांचा श्वास
हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,
5आणि वाळवंटातील उष्णतेसारखा.
परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता;
जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते,
तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते.
6या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह
सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील,
जुन्या द्राक्षारसाची मेजवानी—
सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस.
7जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते,
चादर जी सर्व राष्ट्रांना झाकते,
या पर्वतावर याहवेह तिचा नाश करतील;
8सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील.
सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील
अश्रू पुसून टाकतील;
ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा
सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील.
याहवेह असे बोलले आहेत.
9त्या दिवशी लोक असे म्हणतील,
“निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत;
आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले.
हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला;
चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.”
10याहवेहचा हात या पर्वतावर राहील;
परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो,
तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.
11जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात
तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील.
त्यांच्या हातात चतुराई असतानाही
परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.
12ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील
आणि त्या खाली येतील;
ते त्यांना खाली जमिनीवर आणून,
पूर्ण धुळीत मिळवतील.

सध्या निवडलेले:

यशायाह 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन