यशया 25:1-5
यशया 25:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन. कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस, जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस, कारण तू शत्रूंच्या नगराला ढीग केले आहेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले आहेस, आणि परक्यांचे महाल असे ते नगर राहिले नाही. याकरिता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दयी राष्ट्रे तुला भीतील. कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस. जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो, तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस. उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील
यशया 25:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या. तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही. म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील; निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील. तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे, आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते.
यशया 25:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्त्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत. तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही. ह्यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करतील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरतील. कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास. रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्यांचे जयगीत होते.