YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 3:7-19

इब्री 3:7-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, “‘आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’ त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, ‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.”’ म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’ बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.” कारण ऐकूनही कोणी ‘चीड आणली’? मोशेच्या द्वारे मिसरातून निघालेले सर्वच नव्हेत काय? आणि ‘चाळीस वर्षे तो कोणावर ‘संतापला’? ज्यांनी पाप केले, ‘ज्यांची प्रेते रानात पडली,’ त्यांच्यावर नव्हे काय? आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही.

सामायिक करा
इब्री 3 वाचा

इब्री 3:7-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.” म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत. पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुध्द बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते? आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती. कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.

सामायिक करा
इब्री 3 वाचा

इब्री 3:7-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती. जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि माझे मार्ग त्यांना ठाऊक नाहीत. मी रागाने स्वतःला शपथेने बद्ध करून घेतले की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ” बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा. अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही. जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे. ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का? आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली? ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत त्यांना नाही तर कोणाला बोलत होते? आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.

सामायिक करा
इब्री 3 वाचा

इब्री 3:7-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत; म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, जेथे मी त्यांना विसावा दिला असता, तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत. बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके विश्वासहीन दुष्ट मन तुमच्यांत कोणाचेही असू नये म्हणून जपा. उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये; कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. धमर्र्शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले, त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. देवाची वाणी ऐकून त्याच्याविरुद्ध बंड पुकारणारे लोक कोण होते? ज्यांना मोशेने मिसरमधून बाहेर काढले होते, तेच सर्व नव्हते काय? चाळीस वर्षे देव कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की, “तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही.

सामायिक करा
इब्री 3 वाचा