YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 1:12-17

हबक्कूक 1:12-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांना समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहेस? तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो. तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?

सामायिक करा
हबक्कूक 1 वाचा

हबक्कूक 1:12-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही. मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस? तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत. ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात. म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात. कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते. तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?”

सामायिक करा
हबक्कूक 1 वाचा

हबक्कूक 1:12-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे. तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता? तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो. दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो, तो त्यांना जाळ्यात पकडतो, मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो, आणि तो आनंदित व उल्हासित होतो. म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो. तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय, निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय?