YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 1:12-17

हबक्कूक 1:12-17 MRCV

हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे. तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता? तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो. दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो, तो त्यांना जाळ्यात पकडतो, मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो, आणि तो आनंदित व उल्हासित होतो. म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो. तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय, निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय?

हबक्कूक 1 वाचा