दानीएल 2:20-23
दानीएल 2:20-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दानीएल म्हणाला, “देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत; तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”
दानीएल 2:20-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो म्हणाला, “देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो, कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.” तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो; तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो. तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो, कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो, आणि प्रकाश त्यामध्ये वसतो. माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो, कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले; आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे.
दानीएल 2:20-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि दानीएल म्हणाला: “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे. ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात. गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो. हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”