YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:9-16

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. ‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले. ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले; त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले. ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले. त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली. “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले. त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले. त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. ‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले. ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले; त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने सभ्यता व सुज्ञता यांनी संपन्न केले. त्यामुळे त्याने त्याला मिसर देशावर व राजघराण्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले. मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबने त्याच्या मुलांना म्हणजेच तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या सफरीवर पाठविले. मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले. योसेफने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग - सर्व मिळून पंचाहत्तर माणसे - ह्यांना बोलावून घेतले. ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो मरण पावला व आपले पूर्वजही तेथे मरण पावले. त्यांना शखेम या स्थळी नेण्यात आले आणि जी कबर अब्राहामने तिथे हमोराच्या पुत्राकडून रोख रक्कम देऊन विकत घेतली होती, तीत त्यांना पुरले.