YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:9-16

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 MARVBSI

नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. ‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले. ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले; त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.

प्रेषितांची कृत्ये 7:9-16 साठी चलचित्र