“कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली. “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले. त्यांच्या दुसर्या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले. त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.
प्रेषित 7 वाचा
ऐका प्रेषित 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 7:9-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ