YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 26:19-32

प्रेषितांची कृत्ये 26:19-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःखसहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल, यहूदी लोकांस तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील. पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.” पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे. यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?” पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.” यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले. ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.” अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”

प्रेषितांची कृत्ये 26:19-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“अशा रीतीने, अग्रिप्पा महाराज, मी त्या स्वर्गीय दृष्टांताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले. तर मी प्रथम दमास्कस, यरुशलेम आणि यहूदी प्रांतातील, लोकांना व गैरयहूदी लोकांना, असा प्रचार केला की त्या सर्वांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळावे व पश्चात्तापास योग्य अशी फळे द्यावी. या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्या गोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्या पलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही. त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तोच प्रथम मरणातून पुन्हा उठेल.” हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.” परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे. महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कोठे जगाच्या कानाकोपर्‍यात घडलेल्या नाहीत. अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.” अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?” पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ किंवा थोड्या वेळात परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.” तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले. आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले की, “या माणसाला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.” अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”

प्रेषितांची कृत्ये 26:19-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही; तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा. ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते. तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही. त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणार्‍यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांना व परराष्ट्रीयांनाही प्रकाश प्रकट करावा.” ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता, फेस्त मोठ्याने बोलला, “पौला, तू वेडा आहेस; विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.” पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो. ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्‍यात घडलेले नाही. अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” तेव्हा अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस!” पौल म्हणाला, “थोडके किंवा फार, कसेही असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधनांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.” त्याने असे म्हटल्यावर राजा, सुभेदार, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले; आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.” तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते.”

प्रेषितांची कृत्ये 26:19-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही तर प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि नंतर अवघ्या यहुदियात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करीत फिरलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा. ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते. तथापि देवाकडून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांना साक्ष देत आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यानी व मोशेने सांगितले त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही, त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.” ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त ओरडून म्हणाला, “पौल, तू वेडा आहेस! अतिशिक्षण मिळवल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!” पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे. ह्या गोष्टी महाराज अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत, त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे एखाद्या कोपऱ्यात घडलेले नाही. महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?” पौल म्हणाला, “अल्पावधी किंवा दीर्घकाळ, कसेही असो केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी माझ्या बेड्यांखेरीज इतर बाबतीत माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.” त्यानंतर राजा, राज्यपाल, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.” अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”