प्रेषितांची कृत्ये 21:15-40
प्रेषितांची कृत्ये 21:15-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले. मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले. तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता. तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील. म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत; त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी [असा काही नियम पाळू नये फक्त] मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ह्यांपासून अलिप्त राहावे.” तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले. ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.” त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला. तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले; कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय? ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?” तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.” त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला
प्रेषितांची कृत्ये 21:15-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो. कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता. आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे. या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो. मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल. जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.” मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल. सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलाच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.” ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम शहरातील पाहिले होते, त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता, लोकांस वाटले, पौलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे. सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली. ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले. मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले. गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे. जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले. कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.” शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले ज्या मिसरी मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस, त्या मिसरी मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.” पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सस नगरात राहणारा मी एक यहूदी आहे, मी एका महत्त्वाच्या शहराचा नागरिक आहे, मी तुम्हास विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.” जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले, जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला.
प्रेषितांची कृत्ये 21:15-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता. आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते. क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला. त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत. तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस. तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील, तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही. गैरयहूदी विश्वासणार्यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.” दुसर्या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला. ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले, ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.” या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता. तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले. ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले. सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली. तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला. पौल पायर्यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले. त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!” पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय? ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?” पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.” सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला
प्रेषितांची कृत्ये 21:15-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले. मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले. तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता. तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील. म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत; त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी [असा काही नियम पाळू नये फक्त] मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ह्यांपासून अलिप्त राहावे.” तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले. ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.” त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला. तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले; कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय? ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?” तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.” त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला
प्रेषितांची कृत्ये 21:15-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेम येथे गेलो. आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले, त्याच्या घरी आम्ही राहणार होतो. यरुशलेममध्ये आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबच्या घरी आला. सर्व वडीलजनही तेथे आले. त्याने त्यांना भेटून त्याच्या सेवेद्वारे जी कार्ये देवाने यहुदीतरांमध्ये केली होती, त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहेत, असे हजारो लोक यहुदी लोकांमध्ये आहे. हे तुम्ही पाहातच आहात, ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुमच्याविषयी त्यांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही यहुदीतरांत राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मोशेच्या नियमशास्राचा त्याग करावयास शिकवता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगता. तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खातरीपूर्वक ऐकतील. म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत. त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळविण्यात आले आहे, त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून योग्य प्रकारे वागता हे सर्वांस कळेल. मात्र ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा यहुदीतरांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व लैंगिक अनैतिकता ह्यांपासून अलिप्त राहावे.” तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्याबरोबर शुद्धीकरणाचा विधी पार पाडला. नंतर मंदिरात जाऊन त्याने व्रताचे दिवस कधी संपतील याविषयी सूचना दिली कारण त्यानंतर तो त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण वाहणार होता. ते सात दिवस पूर्ण होत आले तेव्हा आशिया प्रांतातल्या यहुदी लोकांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून ओरडून म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, धावा हो धावा, आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो, तोच हा आहे. शिवाय ह्याने ग्रीक लोकांना मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे.” त्याने इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती. सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी उसळली. त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले. ते त्याला ठार मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराला बातमी कळली की, संबंध यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. शिपाई व रोमन अधिकारी ह्यांना घेऊन तो त्यांच्याकडे तत्काळ धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबविले. सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला, मग हा कोण व ह्याने काय केले, असे तो विचारू लागला. लोक निरनिराळी ओरड करू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खातरी लायक असे काही कळेना म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायऱ्यांवर आला, तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले. लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता. पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला विनंती केली, “मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “तुला ग्रीक भाषा येते काय? ज्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार सशस्त्र मारेकऱ्यांना रानात नेले, तोच मिसरी तू आहेस ना?” पौलाने म्हटले, “मी यहुदी असून किलिकिया नगरातील तार्स ह्या महत्त्वपूर्ण ठिकाणचा राहणारा आहे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.” त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले आणि अगदी शांत झाल्यावर हिब्रू भाषेत तो पुढीलप्रमाणे बोलला