YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 19:31-43

२ शमुवेल 19:31-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग बर्जिल्लय गिलादी हा रोगलीम येथून आला आणि राजाला यार्देनेपार पोचवण्यासाठी त्याच्याबरोबर नदी उतरून गेला. बर्जिल्लय फार वयातीत होता; त्याचे वय ऐंशी वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्लयाने त्याला अन्नपाणी पुरवले होते; तो फार मोठा मनुष्य होता. राजा बर्जिल्लयाला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; मी तुला यरुशलेमेत आपल्याजवळ ठेवून तुझे पालनपोषण करीन.” बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे? आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्‍यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्‍यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे? आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा? आपल्या दासाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी माझ्या आईबापाच्या कबरस्तानाजवळ मी मरेन; पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या; मग आपणाला वाटेल ते त्याचे करा.” राजा म्हणाला, “किम्हामाने माझ्याबरोबर पलीकडे यावे; तुला बरे वाटेल तसे मी त्याचे करीन; तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन.” मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला. ह्या प्रकारे राजा नदी उतरून गिलगालास गेला; किम्हामही त्याच्याबरोबर गेला, यहूदाचे सर्व लोक व अर्धे इस्राएल लोक राजाला पलीकडे घेऊन गेले. तेव्हा सर्व इस्राएल येऊन राजाला म्हणू लागले, “आमचे बांधव यहूदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले; महाराजांना त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देनेपार आणले असे का?” तेव्हा सर्व यहूद्यांनी इस्राएल लोकांना उत्तर दिले, “महाराज आमचे जवळचे आप्त आहेत, तर तुम्ही ह्याबद्दल का रुसता? आमच्या खाण्यापिण्याबद्दल महाराजांना काही खर्च झाला आहे काय? त्यांनी आम्हांला काही इनाम दिले आहे काय?” इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.

सामायिक करा
२ शमुवेल 19 वाचा

२ शमुवेल 19:31-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला. बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला. दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरूशलेमेमध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन. पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का? मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ? आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी? पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा. तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला. नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोहचवायला आले. सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?” तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांस सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय?” इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.

सामायिक करा
२ शमुवेल 19 वाचा

२ शमुवेल 19:31-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता. बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता. राजाने बारजिल्लईस म्हटले, “माझ्याबरोबर पार चल आणि यरुशलेममध्ये माझ्याजवळ राहा आणि मी तुझे पालनपोषण करेन.” पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे? मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा? आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा? आपल्या सेवकाला परत जाऊ द्या, की मी माझ्या नगरात, माझ्या पित्याच्या व आईच्या कबरेजवळ पुरला जाईन. परंतु आपला सेवक किमहाम येथे आहे. त्याला माझ्या स्वामीबरोबर पार जाऊ द्यावे, व आपणास जे योग्य वाटेल ते आपण त्याचे करावे.” राजाने म्हटले, “किमहाम माझ्याबरोबर पार जाईल आणि तुझ्या इच्छेनुसार मी त्याचे करेन. आणि जे मी तुला करावे असे तुला वाटते ते मी तुझ्यासाठी करेन.” तेव्हा सर्व लोकांनी यार्देन पार केली आणि मग राजाने पार केली. राजाने बारजिल्लईचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि बारजिल्लई आपल्या घरी परत गेला. जेव्हा राजा यार्देन पार करून गिलगालकडे गेला, किमहाम सुद्धा त्यांच्याबरोबर गेला. यहूदाहचे सर्व सैन्य आणि इस्राएलच्या अर्ध्या सैन्यांनी दावीदाला पार नेले. लवकरच सर्व इस्राएली लोक दावीद राजाकडे येऊन त्यांना म्हणू लागले, “आमचे भाऊबंद, यहूदीयाचे लोक यांनी राजाला का चोरून नेले आणि त्यांना व त्यांच्या घराण्याला, त्यांच्या सैन्यासह यार्देन पार करून नेले?” यहूदीयाच्या सर्व लोकांनी इस्राएली लोकांना उत्तर दिले, “आम्ही असे केले, कारण राजा आमचा जवळचा नातेवाईक आहे. तुम्हाला त्याविषयी का राग यावा? राजाच्या सामुग्रीतील आम्ही काही खाल्ले आहे काय? आमच्यासाठी आम्ही काही घेतले आहे काय?” यावर इस्राएली लोकांनी यहूदीयाच्या लोकांना उत्तर दिले, “राजामध्ये आम्हाला दहा हिस्से आहेत; म्हणून दावीदावर तुमच्यापेक्षा आमचा हक्क मोठा आहे. मग तुम्ही आम्हाला का तुच्छ लेखता? आमच्या राजाला परत आणण्याविषयी प्रथम आम्ही बोलणे केले नाही काय?” परंतु यहूदीयाच्या माणसांनी इस्राएलच्या लोकांपेक्षा अधिक जोराने दावा केला.