YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 19:31-43

2 शमु. 19:31-43 IRVMAR

गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला. बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला. दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरूशलेमेमध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन. पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का? मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ? आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी? पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा. तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला. नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोहचवायला आले. सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?” तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांस सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय?” इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.