२ शमुवेल 12:22-23
२ शमुवेल 12:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल. पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.
२ शमुवेल 12:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’ परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”
२ शमुवेल 12:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील; पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल? मी त्याच्याकडे जाईन, पण ते माझ्याकडे परत येणार नाही.”