२ राजे 23:29-30
२ राजे 23:29-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले. त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुशलेमेस पोहचवले; त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्याला मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले.
२ राजे 23:29-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करून गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्यास पाहिले आणि ठार केले. योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरूशलेमेला आणला. त्यास त्याच्या कबरीत पुरले. मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्यास पुढचा राजा केले.
२ राजे 23:29-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले. योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.