YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 17:6-23

२ राजे 17:6-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले. ह्याचे कारण असे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली, आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम व इस्राएलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम ह्यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तसेच इस्राएल लोकांनी आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या; पहारेकर्‍यांचे बुरूज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरांत त्यांनी उच्च स्थाने स्थापन केली. त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरामूर्ती स्थापन केल्या; आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालवली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्च स्थानी धूप जाळला आणि परमेश्वराला संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. परमेश्वराने त्यांना “मूर्तीची उपासना करू नका” असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.” इतके असूनही ते ऐकेनात; तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यांना पढवलेले त्याचे निर्बंध ह्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यांना बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली. त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे अग्नीत होम करून त्यांचे अर्पण केले; ते शकुनमुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्याला संताप येतो ते करण्यासाठी त्यांनी आपल्याला वाहून घेतले. त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही. यहूदानेही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत; इस्राएलाने जे नियम केले होते त्यांचे त्याने अवलंबन केले. म्हणून परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यांना पिडले, त्यांना लुटणार्‍यांच्या हाती दिले व शेवटी त्यांना आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले. त्याने इस्राएलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले; तेव्हा लोकांनी नबाटपुत्र यराबाम ह्याला आपला राजा केले; त्या यराबामाने इस्राएलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करवले. यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले; त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.

सामायिक करा
२ राजे 17 वाचा

२ राजे 17:6-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले. परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत. इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली. प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतीस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले. आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला. त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते. इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.” पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला. परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते. आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली. त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही. यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले. त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देऊन लुटारुंच्या हाती दिले. त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले. यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही. अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.

सामायिक करा
२ राजे 17 वाचा

२ राजे 17:6-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले. हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले. इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली. त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले. ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली. याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली. याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.” परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले, त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले. त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली. त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला. म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले, परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले. यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्‍यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले. जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराबामास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले. इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही, जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.