YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 9:13-28

२ इतिहास 9:13-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे; ह्याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत; आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शलमोनाकडे सोने, चांदी आणीत. शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. त्याप्रमाणेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीनशे शेकेल सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोनगृहात ठेवल्या. राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनवले, व ते शुद्ध सोन्याने मढवले. सिंहासनास सहा पायर्‍या आणि सोन्याचे पादपीठ लावले; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले. त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक सिंह असे एकंदर बारा सिंह केले; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते. शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोनी वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नसे. हूरामाच्या कामदारांबरोबर राजाची जहाजे तार्शीशास जात असत; तीनतीन वर्षांनी ही तार्शीशास जाणारी जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणीत असत. शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतींत पृथ्वीवरील सर्व राजांहून श्रेष्ठ होता. देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे राजे त्याच्या दर्शनास येत. प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्षे आणत असे. शलमोनाचे घोडे व रथ ह्यांची चार हजार ठाणी होती; त्याच्याजवळ बारा हजार राऊत होते; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरांत व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. फरात नदीपासून पलिष्ट्यांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरच्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे. राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबरांच्या झाडांप्रमाणे विपुल केले. लोक मिसराहून व इतर सर्व देशांहून शलमोनासाठी घोडे आणत.

सामायिक करा
२ इतिहास 9 वाचा

२ इतिहास 9:13-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट किक्कार एवढे असे. याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला. याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या. राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले. या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता. सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते. राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे. राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तीन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत. वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत. हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे. घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरूशलेमामध्ये केली होती. फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता. यरूशलेमचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती. मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.

सामायिक करा
२ इतिहास 9 वाचा

२ इतिहास 9:13-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते, व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या. नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. त्या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याला जोडूनच पाय ठेवण्यासाठी सोन्याचे पायदान होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह उभे केले होते. प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत. संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व राजे येत असत. आणि जे लोक येत असत ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. शलोमोनाकडे घोड्यांसाठी आणि रथांसाठी चार हजार तबेले होते आणि बारा हजार घोडे होते, जे त्याने रथाच्या नगरांमध्ये आणि यरुशलेममध्ये राजाने स्वतःजवळ ठेवले होते. फरात नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती.