शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते, व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या. नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. त्या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याला जोडूनच पाय ठेवण्यासाठी सोन्याचे पायदान होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह उभे केले होते. प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत. संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व राजे येत असत. आणि जे लोक येत असत ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत. शलोमोनाकडे घोड्यांसाठी आणि रथांसाठी चार हजार तबेले होते आणि बारा हजार घोडे होते, जे त्याने रथाच्या नगरांमध्ये आणि यरुशलेममध्ये राजाने स्वतःजवळ ठेवले होते. फरात नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती.
2 इतिहास 9 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 इतिहास 9:13-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ