YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 6:7-12

1 तीमथ्य 6:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे. हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस

सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा

1 तीमथ्य 6:7-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्रे असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे. जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि फासात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतिला नेऊन त्यांचा पुरा नाश करतात. कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा

1 तीमथ्य 6:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा

1 तीमथ्य 6:7-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपण जगात काही आणले नाही आणि निश्‍चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही! तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत. हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर. श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा