कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे. हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस
1 तीम. 6 वाचा
ऐका 1 तीम. 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 तीम. 6:7-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ