YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 5:1-8

1 तीमथ्य 5:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर. तरुणांना बंधूसमान मानून, वडील स्त्रियांना मातांसमान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानून बोध कर. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते; परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांग. जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा

1 तीमथ्य 5:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर. तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव. ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर. पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे. तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते. पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे. त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा

1 तीमथ्य 5:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरूणांशी बोल. वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे. ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबियांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडायला शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो. जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग. परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा

1 तीमथ्य 5:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ज्येष्ठ माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून त्याचा आदर कर. युवकांना बंधूसमान मानून, वडीलधाऱ्या स्त्रियांस मातेसमान मानून व तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते. जी विधवा खरोखरीची विधवा आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते. परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी दोषविरहित व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन कर. परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा