YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 5:1-8

1 तीमथ्य 5:1-8 MRCV

वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरूणांशी बोल. वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे. ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबियांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडायला शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो. जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग. परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.

1 तीमथ्य 5 वाचा