YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 28:20-25

१ शमुवेल 28:20-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग शौल भूमीवर सपशेल पालथा पडला; शमुवेलाच्या भाषणाने तो अत्यंत भयभीत झाला; त्याच्यात काही त्राण उरले नाही. त्याने दिवसभर व रात्रभर बिलकुल अन्न सेवन केले नव्हते म्हणून त्याच्या अंगात मुळीच ताकद उरली नव्हती. मग ती स्त्री शौलाकडे आली व तो फार व्याकूळ झाला आहे असे पाहून त्याला म्हणाली, “पाहा, आपल्या दासीने आपले म्हणणे ऐकले, आणि आपला प्राण मुठीत धरून आपण मला सांगितलेले शब्द मी ऐकले. तर आता आपणही आपल्या दासीचे म्हणणे ऐका; मी आपणाला घासभर अन्न वाढते ते खा म्हणजे वाटेने चालायला आपणाला शक्ती येईल.” तो म्हणाला, “मला नको, मी खाणार नाही.” त्या स्त्रीप्रमाणे त्याच्या चाकरांनीही त्याला आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे ऐकले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने त्वरेने कापले, आणि थोडे पीठ घेऊन ते तिने मळले आणि बेखमीर भाकरी भाजल्या; मग तिने ते अन्न शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेवले, आणि ते जेवले. नंतर ते त्या रात्री निघून गेले.

सामायिक करा
१ शमुवेल 28 वाचा

१ शमुवेल 28:20-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती. मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत. तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही ही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.” परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला. त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या. मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.

सामायिक करा
१ शमुवेल 28 वाचा

१ शमुवेल 28:20-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते. जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले. तर आता माझा शब्द माना, मी तुम्हाला थोडे अन्न वाढते ते खा म्हणजे आपल्या वाटेने जाण्यास तुम्हाला शक्ती असावी.” तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या. नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले.