YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 20:12-23

१ शमुवेल 20:12-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योनाथान दाविदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा ह्या सुमाराला माझ्या बापाचे मनोगत काढल्यावर तुझ्या हिताचे काही असले तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय? तुझा घात करण्याचे माझ्या बापाच्या मनात असले तर मी तुला ते कळवून तू सुखरूप जावे म्हणून तुला मी रवाना केले नाही तर योनाथानाचे असेच, किंबहुना ह्याहूनही अधिक अनिष्ट परमेश्वर करो; परमेश्वर जसा माझ्या बापाच्या बरोबर आहे तसाच तो तुझ्याबरोबर असो. माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेमदया तू माझ्यावर करावीस. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नकोस; परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा ह्या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नकोस. ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.” योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता. योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल. तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा. मग मी जणू काय निशाणा मारत आहे असे दाखवून त्या दिशेकडे तीन बाण सोडीन. मग पाहा, मी पोरास सांगेन, ‘जा, बाण शोधून आण; पाहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये’ असे मी त्या पोराला मोठ्याने म्हणालो म्हणजे तू ये; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझे कुशलच होईल, तुझे वाईट काही होणार नाही. पण जर मी त्या पोराला म्हणालो की, ‘बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण परमेश्वराने तुला रवाना केले आहे. ज्याविषयी तुझे माझे भाषण झाले आहे त्यासंबंधाने तुझ्यामाझ्यामध्ये परमेश्वर निरंतर साक्षी असो.”

सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा

१ शमुवेल 20:12-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

योनाथान दावीदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय? जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर परमेश्वर देव योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. परमेश्वर जसा माझ्या बापा बरोबर होता तसा तो तुझ्या बरोबर असो.” मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही, तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको; म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.” मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली. योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील. तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा. मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन. मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे. परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे. आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.”

सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा

१ शमुवेल 20:12-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांची मी शपथ घेतो की, परवा या सुमाराला मी खात्रीने माझ्या पित्याचे मनोगत समजून घेईन, जर तुझ्या हिताचे काही असले तर ते मी तुला कळविणार नाही काय? परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत. आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही, एवढेच नाही तर, याहवेहने दावीदाच्या प्रत्येक शत्रूंना पृथ्वीच्या पाठीवरून काढून टाकले तरीसुद्धा माझ्या कुटुंबावरील तुझी दया कधीही काढू नकोस.” तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.” आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली. नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार. परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा. मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन. नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.” पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत. आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.”