योनाथान दाविदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा ह्या सुमाराला माझ्या बापाचे मनोगत काढल्यावर तुझ्या हिताचे काही असले तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय? तुझा घात करण्याचे माझ्या बापाच्या मनात असले तर मी तुला ते कळवून तू सुखरूप जावे म्हणून तुला मी रवाना केले नाही तर योनाथानाचे असेच, किंबहुना ह्याहूनही अधिक अनिष्ट परमेश्वर करो; परमेश्वर जसा माझ्या बापाच्या बरोबर आहे तसाच तो तुझ्याबरोबर असो. माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेमदया तू माझ्यावर करावीस. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नकोस; परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा ह्या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नकोस. ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.” योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता. योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल. तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा. मग मी जणू काय निशाणा मारत आहे असे दाखवून त्या दिशेकडे तीन बाण सोडीन. मग पाहा, मी पोरास सांगेन, ‘जा, बाण शोधून आण; पाहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये’ असे मी त्या पोराला मोठ्याने म्हणालो म्हणजे तू ये; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझे कुशलच होईल, तुझे वाईट काही होणार नाही. पण जर मी त्या पोराला म्हणालो की, ‘बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण परमेश्वराने तुला रवाना केले आहे. ज्याविषयी तुझे माझे भाषण झाले आहे त्यासंबंधाने तुझ्यामाझ्यामध्ये परमेश्वर निरंतर साक्षी असो.”
१ शमुवेल 20 वाचा
ऐका १ शमुवेल 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 20:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ