१ राजे 17:1-5
१ राजे 17:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “येथून निघून पूर्व दिशेस जा, व यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.” परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक जाऊन राहिला.
१ राजे 17:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
१ राजे 17:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.” तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.” म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला.