YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 17:1-5

1 राजे 17:1-5 IRVMAR

गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.