YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 4:14-17

१ करिंथ 4:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.

सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा

१ करिंथ 4:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा. यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.

सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा

१ करिंथ 4:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल.

सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा

१ करिंथ 4:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.

सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा

१ करिंथ 4:14-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो; कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार प्रशिक्षक असले तरी पुष्कळ पालक नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूवरील निष्ठेमुळे शुभवर्तमानाच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. तो ख्रिस्ती जीवनामध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. जसे मी सर्वत्र प्रत्येक ख्रिस्तमंडळींत शिकवितो, त्याप्रमाणे तो ख्रिस्तामध्ये माझ्या जीवनशैलीची तुम्हांला आठवण करून देईल.

सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा