YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 4:14-17

1 करिंथकरांस 4:14-17 MRCV

तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल.