१ करिंथ 2:7-13
१ करिंथ 2:7-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो. कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही. परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
१ करिंथ 2:7-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे. तरी या युगाच्या अधिकार्यांना ही योजना समजलीच नाही, त्यांना ती समजली असती, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रूसावर कधीच खिळले नसते. तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत— परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो. एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे. आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.
१ करिंथ 2:7-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; तुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते. ते ह्या युगातल्या अधिकार्यांतील कोणालाहळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते; हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;” कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्यावाचून मनुष्यया गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मात्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवत्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.
१ करिंथ 2:7-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते. ते ह्या युगातल्या अधिपतींतील कोणालाही कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवशाली प्रभूला क्रुसावर चढवले नसते. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व मानवी अंत:करणाला जे भिडले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केले आहे, परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो. माणसाच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्याच्या स्वतःच्या आत्म्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले, ते आपण ओळखून घ्यावे. तर मग आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.