YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 2:7-13

1 करिंथकरांस 2:7-13 MRCV

आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे. तरी या युगाच्या अधिकार्‍यांना ही योजना समजलीच नाही, त्यांना ती समजली असती, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रूसावर कधीच खिळले नसते. तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत— परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो. एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे. आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.