१ करिंथ 12:14-19
१ करिंथ 12:14-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे. जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते? पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?
१ करिंथ 12:14-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे. समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कोठे असते?
१ करिंथ 12:14-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
१ करिंथ 12:14-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते. जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते?